Site icon सक्रिय न्यूज

सुट्टीवर आलेला सैन्यदलातील जवान बेपत्ता…..!

सुट्टीवर आलेला सैन्यदलातील जवान बेपत्ता…..!
केज दि.१० – सैन्य दलातील सुट्टीवर गावी आलेला जवान हा घरगुती कारणा वरून घरातून निघून गेला असून तो बेपत्ता असल्याची नोंद पोलीसात करण्यात आली आहे.
            केज तालुक्यातील उमरी येथील प्रदीप सोनवणे हा सैन्य दलातील जवान गावी सुट्टीवर आला होता. परंतु घरगुती कारणातून रागाऊन प्रदीप सोनवणे हा जवान दि. ९ जून रोजी दुपारी १.३० वा च्या दरम्यान मोटार सायकल क्र.(एम एच-४४/क्यू०६३७) वरून घरातून निघून गेला आहे. त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असून प्रदीप याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. म्हणून त्याची आई श्रीमती नंदूबाई सोनवणे हिच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात प्रदीप सोनवणे बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
                  दरम्यान, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या आदेशा वरून पोलीस नाईक दिलीप गित्ते हे तपास करीत असून प्रदीप सोनवणे याच्या विषयी काही माहिती मिळाल्यास तात्काळ केज पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version