Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात चार ठिकाणी चोऱ्या……! 

केज तालुक्यात चार ठिकाणी चोऱ्या……! 
केज दि.१० – चोरट्यांनी तालुक्यात चार ठिकाणी डल्ला मारला आहे. मोबाईल टॉवर चे  ९० हजार रुपयांचे केबल वायर चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या असून याप्रकरणी केज व युसुफवडगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
                    केज तालुक्यातील नाव्होली येथे असलेल्या मोबाईल टॉवरवरील एअरटेल कंपनीचे २३५ मीटर कॉपर केबल वायर व ४० फूट जिओ कंपनीचे केबल वायर असा २० हजार ७५ रुपये किंमतीचे वायर अज्ञात चोरट्यांनी नेल्याची घटना ८ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. कंपनीचे अधिकारी शिवलाल मसाजी जगताप ( रा. भवानवाडी ता. जि. बीड ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार अशोक मेसे हे पुढील तपास करत आहेत.
    तसेच इंडस कंपनीचे मोबाईल टॉवर आनंदगाव ( सा. ), चंदनसावरगाव, पैठण ( सा. ) या गावात असून या तिन्ही टॉवरवरील अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये किंमतीचे जिओ कंपनीचे केबल वायर आणि पावर केबल वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. कंपनीचे सुरक्षा अधिकारी गोविंद दत्तात्रय मचाले ( रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि. नगर ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version