बीड दि.११ – भाजपच्या नेत्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या केज तालुका भाजपच्या कार्यकर्त्यांनी केज पासून जवळच असलेल्या चिंचपूर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करून भाजप पक्षाला सुबुद्धी मिळो अशी प्रार्थना करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, जि. प.सदस्य विजयकांत मुंडे, युवानेते विष्णू घुले, दत्ता धस, संभाजी गायकवाड, बालासाहेब राऊत, प्रकाश मुंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.