Site icon सक्रिय न्यूज

लकी ड्रॉ मध्ये आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क करा……!

लकी ड्रॉ मध्ये आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क करा……!
केज दि.१२ – मागच्या दोन दिवसांपूर्वी केज शहरातील साई एंटरप्राइजेस नावाने चालवण्यात आलेल्या लकी ड्रॉ चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.यामध्ये आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी ही पुढे येऊन पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केज पोलिसांनी प्रेसनोट द्वारे केले आहे.
            अधिक माहिती अशी की, केज पोलीस स्टेशन गु.र.नं. 233 / 2022 कलम 420,34 प्रमाणे गुन्हा दिनांक 10/06/2022 रोजी दाखल असुन सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली आहे की, गुन्ह्यातील आरोपीतांनी केज शहरात साई एंटरप्रायजेस च्या नावाने लकी ड्रॉ चे आयोजन केले होते. केज तालुका व बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यात देखील लकी ड्रॉ च्या नावाने मोठमोठे बक्षिसांचे आमिष दाखवुन मोठ्या प्रमाणात 1500/- रु. किमती प्रमाणे कार्ड सामान्य जनतेस विक्री केले.परंतु  प्रत्यक्षात लकी ड्रॉ मधे दर्शविले गेलेले मोठे व मौल्यवान बक्षीस कोणासही न देता कार्ड धारकांना लकी ड्रॉ मधे फसवणुक केल्याने गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
                  दरम्यान, पोलीस तपासात देखील दिलेल्या फिर्यादीला दुजोरा मिळाला असुन या प्रेस नोट द्वारे सामान्य जनतेस आवाहन करण्यात येते की, ज्यांना कोणाला साई एंटरप्रायजेस च्या लकी ड्रॉ चे या प्रमाणे कार्ड कोणीही विक्री केले असतील व सदर लकी ड्रॉ च्या आधारे ज्यांची फसवणुक झाली असेल अशांनी केज पोलीस स्टेशन येथे येवुन अथवा केज पोलीस स्टेशन फोन क्रमांक 02445252238, तपासी अधिकारी पो.उप निरी. राजेश पाटील, मो.नं. 9168203198 असे आवाहन करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version