बीड दि.१५ – महाराष्ट्र मधे अनेक गड़किल्ले आहेत आणि या गड़किल्ले ची सैर करायला अनेक संस्था अग्रेसर असतात. अशाच गड़किल्ले पाहणी आवड़ असलेल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील केज तालुका येथील चंदनसावरगांव चा सुपुत्र असलेला राज तपसे याने स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड १०० वेळा सर करणारा मराठवाड्यातील पहिला युवक ठरला आहे.
राज तपसे हे सह्याद्रीचे भुते ट्रेकर्स या ग्रुप च्या महाराष्ट्र कार्यकरणी सदस्य असून त्यांनी आज पर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरिल १३६ किल्ल्यांची सफर पुर्ण केली आहे. गड़किल्ले पाहणी आणि त्यांचे संवर्धन करणे त्यांची आवड़ असून त्यांनी ७७६ गडकोट मोहिमा केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने किल्ले राजगड १०० वेळा, रायगड १०४ वेळा, शिवनेरी -९७ वेळा, पन्हाळा ९९ वेळा चढाई करणारे ते मराठवाड्यातील एकमेव युवक आहेत.
राज तपसे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चंदनसावरगांव या गावचे आहेत. ते सध्या व्यवसाया साठी पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. पंरतु आपला व्यवसाय पाहत स्वराज्य कार्यात, गडसंवर्धन करिता त्यांचा सहभाग अग्रेसर असतो. काल दिनांक ११ व १२ तारखेला तिथी नुसार शिवराज्यभिषेक सोहळा राजगड किल्ले वर पार पडला त्यात राज तपसे यांचा मोठा वाटा होता. सह्याद्रीच्या भुते संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवत असतात. या कामगिरी बद्दल त्यांचे मराठवाड्यात कौतुक होत आहे.
दरम्यान, पृथ्वी वरचा खराखुरा स्वर्ग पाहायचा असेल तर स्वराज्याची ढाल बनून राहिलेल्या सह्याद्रीची सफर जीवनातून एकदा तरी प्रत्येकांनी करावी. जीवनात एकदा तरी रायगड आणि राजगड किल्ल्यावर जाऊन यावे असे आवाहनही राज तपसे यांनी केले आहे.