बीड दि.१५ – समर्पित बाठीया आयोगाच्या मार्फत ओबीसींचा इम्पेरियल डाटा चुकीच्या पद्धतीने गोळा करण्याचे काम चालू असून ते तात्काळ थांबवून घरोघरी जाऊन ओबीसींच्या डाटा गोळा करावा या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने समता परिषदेचे सदस्य उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दि. १५ जून २०२२ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव प्रा.पी. टी. चव्हाण, सोनार समाजाचे नेते ॲड. संदीप बेदरे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सल्लागार शेख वजीर, भाजपाच्या संजीवनीताई राऊत, मीनाक्षीताई देवकते, परीट समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश घोडके, मनोज ठाणगे, बंजारा समाजाचे भूषण पवार, धनगर समाजाचे प्रकाश सोनसळे, अविनाश उगले नितीन साखरे, निखिल शिंदे, नितीन राऊत यांच्यासह विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.