Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात ८७ ब्रास वाळूसह ट्रॅक्टर ताब्यात…..!

केज तालुक्यात ८७ ब्रास वाळूसह ट्रॅक्टर ताब्यात…..!
केज दि.१६ – सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज तालुक्यातील कानडी बदन येथे अवैद्य वाळू उपसा आणि अवैद्य वाळू साठ्याविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ८७ ब्रास वाळू चा साठा आणि एक ट्रॅक्टर ताब्यात घेत तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना  गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,  कानडीबदन ता. केज येथे काही इसमानी आपले स्वतःचे फायद्या करिता नदीतून विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करून त्याचा साठा करून ठेवला आहे. सदरची माहिती त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार बालाजी दराडे, राजू वंजारे, मंडळ अधिकारी भागवत पवार, तलाठी पटाईत यांना दिली. पंकज कुमावत यांचे पथक आणि महसूल विभागाच्या पथकाला सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन पहाणी केली असता योगीराज पंढरी साखरे, अनिल भीमराव साखरे आणि अण्णासाहेब विष्णू जगदाळे कानडीबदन ता. केज यांनी अनाधिकृतरित्या नदी पात्रातून वाळूउपसा करून ठेवलेला साठ्यावर तीन ठिकाणी छापा मारून ८७ ब्रास वाळू जप्त केली. ब्रहस्पती रामकीसन नाईकवाडे यांनी त्यांचे  ट्रॅक्टर क्र.(एम एच-४४/एस-३००२) हे अनधिकृतरित्या नदी पात्रातील वाळु भरून घेऊन जात असताना वाळूसह मिळून आल्याने त्यासही ताब्यात घेतले.
         सदर वाहन तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. तसेच मिळून आलेला वाळूसाठा व वाळूने भरलेले ट्रॅक्टर यांच्यावर पुढील कारवाई मंडळ अधिकारी पवार हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version