Site icon सक्रिय न्यूज

खबरदार….. केज शहरातील दोन रोडरोमिओंचा झाला ठाण्यात पाहुणचार…….!

खबरदार….. केज शहरातील दोन रोडरोमिओंचा झाला ठाण्यात पाहुणचार…….!
केज दि.19  – रोडरोमिओं विरुद्ध केज पोलीस ॲक्शन मोडमध्ये असून अशाच दोन बदमाशांना पोलीसांनी महाप्रसाद दिला. सर्वांच्या समोर माफी मागण्याची नामुष्की टवाळखोरांवर आली.
                 सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि सर्व पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या हद्दीत आणि शहरातील महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी कंबर कसली आहे. अशा टवाळखोर टग्याना वठणीवर आणण्यासाठी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना एका गुप्त बातमीदारा मार्फत रोडरोमियोची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी त्या रोडरोमियोंना पोलीस स्टेशनला आणून त्यांचा पाहुणचार करून सरबराई केली. व्यवस्थित विचारपूस करण्यात आली. बऱ्याच पालकांना त्यांची पाल्य काय करत आहेत हेच माहित नाही. त्यामुळे पालकांना पश्चाताप करून माफी मागण्याची वेळ येत आहे. परंतु ते योग्य नाही; त्या पूर्वीच आपण आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे. जेणेकरून आपल्याला माफी मागण्याची वेळ येणार नाही हा स्पष्ट हेतू आहे. तरुण पिढीने शिक्षणाकडे लक्ष द्यावे व कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाऊन आपले पुढील  करियर खराब करू नये. कारण प्रत्येक व्यापारी तसेच सुजान नागरिक आणि पालक तसेच शाळा व कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली या गाडीचे नंबर तसेच त्यांचे फोटो टाकत आहेत. त्यामुळे मुलांच्या पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे जेणे करून त्यांचं शैक्षणिक जीवन धोक्यात येणार नाही.
शेअर करा
Exit mobile version