Site icon सक्रिय न्यूज

राजकीय घडामोडीवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडले मौन……!

राजकीय घडामोडीवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडले मौन……!

मुंबई दि.२२ – मागच्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू असल्या राजकीय घडामोडीवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात मी मुख्यमंत्री च काय पक्ष प्रमुख पद सुद्धा सोडायला तयार आहे परंतु बंडखोर आमदारांनी माझ्या समोर येऊन सांगावे असे आवाहन केले.

               मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केले असून सरकार कोसळण्याची भीती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड केल्याचे एकनाथ शिंदे सांगत असून अन्य आमदारही तोच मुद्दा उपस्थित करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला असून मला पदाची लालसा नाही, शिवसेनेच्या एकाही आमदाराने माझ्या समोर येऊन जर सांगितले की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आम्हाला मान्य नाहीत तर मी आत्ताच राजीनामा द्यायला तयार असल्याचे बोलून दाखवले.
              तर विरोधकांनी आरोप केले तर ते समजू शकतो परंतु आपल्यानीच अविश्वास दाखवला तर दुःख होते असेही ते म्हणाले. तसेच कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ नेहमीच असतो असेही ते म्हणाले.
शेअर करा
Exit mobile version