अंबाजोगाई दि.२३ – येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्री. व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या विशेष बा. लै. खटला क. ३० / २०१८, महाराष्ट्र शासन वि. अण्णा उर्फ भाउराव गदळे या प्रकरणातील आरोपीने अल्पवयीन मुलीस नदीला खेकडे धरू असे आमीष दाखवून तिला घेवून जावून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. सदर प्रकरणात आरोपीस मा. न्यायालयाने अर्थ जन्मठेपेची ( १० वर्ष) शिक्षा व दहा हजार रूपये दंड ठोठावला.
सदरील प्रकरणातील आरोपी अण्णा उर्फ भाउराव प्रभाकर गदळे, रा. दहीफळ वडमाउली, ता. केज, जि.बीड हा फिर्यादीच्या घरी आला व फिर्यादीस तुमचे पोते शिवू लागतो असे फिर्यादीच्या पतीस म्हणाला. नंतर फिर्यादी व तीचा पती हे पोते शिवत असताना फिर्यादीची मुलगी ही न दिसल्याने त्यांनी तिचा शोध घेतला असता त्यावेळी गावातील मुले भेटले व त्यांना विचारले असता आरोपी अल्पवयीन पिडीत मुलीस घेवून गेल्याचे समजले. त्यानुसार पिडीतेचा शोध घेतला असता सांयकाळी सहा चे सुमारास ते शेतात दिसले व आरोपी फिर्यादीला पाहताच पळसाच्या आळयात जावून लपला. त्यावेळी आरोपीस जावून धरले असता तो म्हणाला मी चुकलो. नंतर पीडीतेस विचारले असता तिने सांगीतले की आरोपीने नदीला खेकडे धरू असे आमीष दाखवून घेवून जावून बलात्काराचा प्रयत्न केला.
नंतर फिर्यादीने पिडीतेस घेवून पोलीस ठाण्यात येवून वरील प्रकारची फिर्याद दिली व त्यानुसार पोलीसांनी सदर आरोपी विरुध्द दि. ३१/१०/२०१८ रोजी पो. ठा. केज येथे गु.र.नं. ५४२ / २०१८, कलम ३७६ (२) (1), फौ. सु. का. – २०१८ व ३७६ ( 1 ) (2) भा. द. वी सहकलम ३, ४ बा. लैं. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस अर्ध जन्मठेपेची ( १० वर्ष ) शिक्षा व दहा हजार रूपये दंड ठोठावला.
दरम्यान, या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड.लक्ष्मण फड यांनी काम पाहीले व सदर प्रकरणाचा तपास पो. उपनिरीक्षक एस. एस. कदम यांनी केला तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.