मुंबई दि.२३ – एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार किंवा तो गट शिवसेना पक्षादेशाचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत, नवनियुक्त गटनेते अजय चौधरी अजून काही आमदार आणि नेते यांच्या शिष्टमंडळानं विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेटली आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या ज्या काही दोन बैठका आयोजित केल्या होत्या. आमचे गटनेते अजय चौधरी आणि आमचे प्रतोद सुनील प्रभू यांनी त्यांना नोटीस दिली होती. परंतु बैठकीला आले नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस दिली. काहींनी त्या नोटिसीला उत्तरं दिली. त्यात खरी खोटी कारणं आहेत. म्हणून हे सगळं नजरेस आणणं आणि संविधानानुसार या संदर्भात जो शिस्तभंग आहे त्याबाबत कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलं. 12 आमदारांची नावं दिली, 12 पिटिशन सादर केले आहेत.
यामध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत,संदीपान भुमरे,संजय शिरसाठ,अब्दुल सत्तार,भरत गोगावले,प्रकाश सुर्वे,अनिल बाबर,बालाजी किनीकर,यामिनी जाधव
लता सोनावणे,महेश शिंदे या बारा आमदारांचा समावेश आहे.