बीड दि.२७ – एका अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या प्रकरणातील आरोपीस बीड येथून ताब्यात घेतले असून पुढील तपास पिंक पथकाकडे देण्यात आला आहे.
दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील नागझरी येथील सचिन तोंडे या युवकाने फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून 21 जून रोजी दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी तपासाची सूत्रे हलवत रविवारी रात्री आरोपीस बीड येथून ताब्यात घेतले असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाल्याने आरोपीच्या विरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.