Site icon सक्रिय न्यूज

अबब……दोन दगडांची किंमत 26 कोटी…..!

कधी कोणत्या गोष्टीला काय महत्व येईल ते सांगता येत नाही.अन त्यातली त्यात दगडाला एवढी किंमत येऊ शकते हे म्हणजे जरा वेगळेच वाटते.मात्र तसे घडले असून दोन टॅन्झानाईट दगड विकून टांझानियातील एक खाणकामगार एका रात्रीत कोट्यधीश झाला आहे. आतापर्यंत टॅन्झानाईटच्या शोधातील हे सगळ्यात मोठे दगड असल्याचं सांगितलं जात आहे.

15 किलो वजनाच्या दोन दगडांच्या बदल्यात देशातल्या खाण मंत्रालयानं सानिनू लैझर यांना 34 लाख डॉलर्स (सुमारे 26 कोटी रुपये) एवढी रक्कम दिली आहे. टॅन्झानाईट हा दगड केवळ टांझानियाच्या उत्तर भागात सापडतो आणि तो दागिणे बनवण्यासाठी वापरला जातो. हे पृथ्वीवरील सर्वांत दुर्मिळ रत्नांपैकी एक आहे, आणि येत्या 20 वर्षांत त्याचा पुरवठा पूर्णपणे कमी होईल, असा स्थानिक भूगर्भशास्त्रज्ञाचा अंदाज आहे.मौल्यवान दगडाची विशेषता त्याच्या वेगवेगळ्या रंगछटा जसं की हिरव्या, लाल, जांभळ्या आणि निळ्या रंगछटांमध्ये आहे. दुर्मिळतेमुळे या दगडाला जास्त किंमत आहे. दगडाचा रंग जितका स्पष्ट असतो, तितकी जास्त किंमत मिळते. त्यामुळे दगडही आपले भाग्य उजळू शकतो हे सिद्ध झाले आहे.

शेअर करा
Exit mobile version