Site icon सक्रिय न्यूज

एकनाथ शिंदें च्या नेतृत्वात ”हे” असतील उपमुख्यमंत्री……!

एकनाथ शिंदें च्या नेतृत्वात ”हे” असतील उपमुख्यमंत्री……!
मुंबई दि.३० – एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. इतकंच नाही तर आपण सत्तेबाहेर राहून हे सरकार व्यवस्थित चालेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. ‘मी बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार, असं फडणवीस यांनी जाहीर केलं. मात्र, आता भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आताच फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असा आग्रह केला. त्यामुळे भाजपमध्ये विसंवाद निर्माण झालाय का? असा सवाल विचारला जात असतानाच, देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याही माहिती जे. पी. नड्डा यांनी दिलीय. नड्डा यांनी ट्वीटकरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार हाकलेले देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री असणार आहे.
             दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने हे ठरवले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असायला हवे आणि सरकारमध्ये पदभार सांभाळायला हवा. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाने हे स्पष्ट सांगितले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा. महाराष्ट्रातील जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ताकद लावावी आणि महाराष्ट्र एक विकसित राज्य होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.
शेअर करा
Exit mobile version