Site icon सक्रिय न्यूज

मस्साजोग येथील तरुणाचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न……!

मस्साजोग येथील तरुणाचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न……!

केज दि.४ – तालुक्यातील एका तरुणाने गावातीलच काही जणांच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना आज सोमवारी ( दि. ४ ) बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या तरुणाला एका रिक्षाने जिल्हा रुग्णालयात पाठविले. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समाधान शिवाजी धिवार ( वय २५ वर्ष ) रा. मस्साजोग ( ता. केज ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने गावातील काही व्यक्ती त्रास देत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यास काही कर्मचारी व पोलीसांनी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांने तोपर्यंत विष प्राशन केले. यानंतर तो जमिनीवर लोळत होता.

दरम्यान जिल्हाधिकारी तेथे आले व त्यांनी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका रिक्षात बसवून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. सदरील तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेअर करा
Exit mobile version