केज दि.५ – येथील शिक्षक कॉलनीत खाजगी रखवालीचे काम करीत असलेल्या गुरख्यावर चार ते पाच अज्ञात चोरट्यानी हल्ला करून जखमी केले.
सच्चूसिंग नरबहाद्दूर भंडारी वय ६५ वर्ष हा गुरखा केज येथे खाजगी रखवालीचे काम करीत आहे. दि. ५ जुलै मंगळवार रोजी ते केज बीड महामार्गा लगतच्या शिक्षक कॉलनीत पहाटे ५ च्या दरम्यान गस्त घालीत असताना चार ते पाच अज्ञात चोरट्यानी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात सच्चूसिंग नरबहाद्दूर भंडारी हे गंभीर जखमी झाला आहेत. चोरट्यानी मारहाण करून त्याला जखमी केले आणि त्यांच्याकडील मोबाईल व इतर वस्तू घेऊन पळून गेले. हल्ल्यामुळे गुरखा सच्चूसिंग नरबहाद्दूर भंडारी हा बेशुद्द पडला होता. त्या नंतर त्या रस्त्याने पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी त्याला पाहिले असता त्यांनी त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. जखमी सच्चूसिंग भंडारी याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील संदर्भीय उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, अशा घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे पोलीसांच्या गस्त सुरू आहेत. मात्र अशा घटना घडू नयेत म्हणून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. परिसरात संशयित हालचाली आढळून आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे.