Site icon सक्रिय न्यूज

सरकार बदलताच केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे राजकारणात सक्रिय…..!

सरकार बदलताच केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे राजकारणात सक्रिय…..!
केज दि.६ – केज विधानसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार संगीता विजयप्रकाश ठोंबरे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. राजकीय घडामोडी मध्ये बदल होताच केजच्या माजी आमदार ठोंबरे यांनी पुन्हा राजकारणात एन्ट्री केली असून भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
            स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्या विश्वासू माजी आमदार संगीता ठोंबरे यांची केज विधानसभा मतदारसंघात ओळख आहे. तर संगीता ठोंबरे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने मागासवर्गीय सूतगिरणी उभारली आहे. सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा फोटो सध्या चर्चेत दिसत आहे.
यावरून केज मध्ये पुन्हा भाजपचा दुसरा गट तयार झाल्याचे दिसत आहे.
            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची मुंबई येथील सागर या शासकीय निवासस्थानी माजी आमदार संगीता ठोंबरें, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोक माने,गोपीनाथराव मुंडे सूतगिरणी चे चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांनी आज सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान माजी आमदार संगीता ठोंबरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या भेटीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
शेअर करा
Exit mobile version