Site icon सक्रिय न्यूज

तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून गावात दहशत माजविणारा केज पोलिसांच्या ताब्यात……!

तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून गावात दहशत माजविणारा केज पोलिसांच्या ताब्यात……!
केज दि.८ – नशेच्या अंमलाखाली गावात दहशत माजवून एकावर चाकूने हल्ला करून जखमी केले आणि तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवून गावात प्रचंड दहशत माजविणाऱ्या एका माथेफिरू तरुणाला पोलीसांनी ताब्यात घेतले तर एकजण पळून गेला.
          अधिक माहिती अशी की, दि. ७ जुलै गुरुवार रोजी सायंकाळी ६ वा च्या दरम्यान कळंब आगराच्या एसटीने सुरेश रोकडे हे बोरगावकडे येत होते. त्याच एसटीत नितीन उर्फ बाल्या दत्तात्रय गव्हाणे आणि मनोज बबन गव्हाणे हे उतरत असताना त्यांनी सुरेश रोकडे यास मारहाण केली आणि मनोज गव्हाणे याने हातातील चाकू सुरेश रोकडे याच्या डोक्यात मारून दुखापत केली. सार्वजनिक ठिकाणी सुरेश रोकडे यास शिवीगाळ करीत हातात तीक्ष्ण चाकू घेऊन दहशत माजविली.
या घटनेची माहिती केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना समजताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्या सोबत पोलीस नाईक राजू गुंजाळ, चंद्रकांत काळकुटे आणि हनुमंत गायकवाड यांना सरकारी वाहनाने घटना स्थळी रवाना केले. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच पोलीसांना पाहून मनोज गव्हाणे व नितीन गव्हाणे हे हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून मनोज गव्हाणे यास ताब्यात घेतले. मात्र त्या वेळी त्याचा साथीदार नितीन गव्हाणे हा पळून गेला.
                 दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी झालेले सुरेश रोकडे यांच्या तक्रारी वरुन केज पोलीस ठाण्यात दि. ७ जुलै रोजी मनोज गव्हाणे व नितीन गव्हाणे या दोघा विरुद्ध गु. र. नं. २८२/२०२३ भा. दं. वि. ३२४,३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version