Site icon सक्रिय न्यूज

केज शहरातील मंगळवार पेठ कॉर्नर नजीक अपघात…..!

केज शहरातील मंगळवार पेठ कॉर्नर नजीक अपघात…..!
केज दि.८ – शहरातील मंगळवार पेठ कॉर्नर नजीक अज्ञात वाहनाने पायी घरी निघालेल्या हॉटेल कामगारास धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ च्या दरम्यान घडली.
             शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणारे मधुकर दादाराव डिसले (बाराभाई गल्ली केज) हे घरी निघाले होते. परंतु त्यांना मंगळवार पेठ कॉर्नर नजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच 108 चे पायलट मकरंद घुले व डॉ. ऋतुजा मोटे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीस केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु इजा गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई च्या सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version