Site icon सक्रिय न्यूज

केज बीड रोडवरील टाकळी फाट्यावर मोटारसायकल – रिक्षा अपघात……! 

केज बीड रोडवरील टाकळी फाट्यावर मोटारसायकल – रिक्षा अपघात……! 

केज दि.९ – केज पासून कांही अंतरावर असलेल्या केज बीड रोडवरील टाकळी फाट्यावर मोटारसायकल व रिक्षाचा अपघात झाला असून तिघे जखमी झाले आहेत. सदरील घटना शनिवार दि. ९ जुलै रोजी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली.

                 केज तालुक्यातील उमरी येथील रोहिदास वसंत मोरे (२६) गजेंद्र मोरे यांच्या मोटारसायकलची व रिक्षाची धडक झाली. त्यात मोटारसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात झाल्यानंतर जखमींना तात्काळ एका खाजगी वाहनाने केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
            या अपघातात अशोक रगडे रा. केज हेही जखमी झाले असल्याची माहिती आहे. गजेंद्र मोरे व रोहिदास मोरे यांना गंभीर इजा झाल्याने त्यांना अंबाजोगाई येथे हलवण्यात आले असून एकावर केज येथे उपचार सुरू आहेत. सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शेअर करा
Exit mobile version