Site icon सक्रिय न्यूज

शिंदे गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर……!

शिंदे गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर……!
मुंबई दि.१८ – शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.  शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.                        विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाने  शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
            शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नेमणूक केली जाणार असून प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना उद्याच ( 19 जुलै रोजी) पत्र दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेत बारा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्री एकनिष्ठ असल्याचे दिसत आहे.
शेअर करा
Exit mobile version