Site icon सक्रिय न्यूज

राष्ट्रवादी चे सर्व विभागांसह सेल बरखास्त…..!

राष्ट्रवादी चे सर्व विभागांसह सेल बरखास्त…..!
मुंबई दि. २१ – गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसनेतील बंडाळीनंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. राजकीय हालचालींना वेग आलेला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी मोठा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल तातडीने बरखास्त करण्याचे निर्देश शरद पवारांनी दिले आहेत.
           शरद पवारांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग व सेल बरखास्त करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांचं याबाबतचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल तातडीने बरखास्त केल्याची घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
            दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरील सेल व विभाग बरखास्त करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत. तर राज्यातील सेल आणि विभागाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, शरद पवारांनी इतक्या तातडीने हा निर्णय का घेतला?, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
शेअर करा
Exit mobile version