केज दि.३० – जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झालेत. शेतकऱ्यांना मदत सोडा मात्र धीर देण्यासाठी देखील कृषि विभाग पुढाकार घेत नसल्याने मनसेने आज कृषी कार्यलयात आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व बियाणे उगवले नाहीत याची तक्रारी अर्ज सादर करण्यासाठी कार्यालयात कृषि अधिकारीकच नसलयाने मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयातच माती फेकून आंदोलन केले. कृषी विभागाने महाबीज मंडळाला आदेश दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाने उगवले नाहीत अशा शेतकऱ्यांना विलंब न करता तात्काळ बियाणे बदलून देण्यात यावेत परंतु तालुका कृषी विभागाने अद्यापही तालुक्यातील बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या महाबीज मंडळाला पाठवल्या नाहीत.
शेतकरी दुबार पेरणी करत आहे. शासन आदेश येऊन आठ दिवस झाले तरी देखील अजून एकही शेतकऱ्याला बियाणे बदलून दिले नाही. याला तालुका कृषी विभाग जबाबदार आहे.या कृषी विभागातिल अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मनसे चे पदाधिकारी कृषी कार्यलयात गेले असता तिथे एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे मनसे च्या कार्यकर्त्यानी संतप्त होत कृषी विभागात माती फेक आंदोलन केले व या पुढे अशीच हलगर्जी झाली तर कार्यलयातच नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडात माती भरण्याचा ईशारा मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी दिला आहे.
या आंदोलनाला मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,संतोष अस्वले,गोविंद हाके,गणेश काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.