मुबंई दि.२२ – राज्यातील सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा समजला जाणार सण म्हणजे गणेशोत्सव आणि दहीहंडी. कोरोनामुळे या सगळ्यावर अनेक निर्बंध लावले गेले होते. या निर्बंधासंबधी आणि या सगळ्या सणासंबधी सध्याचे शिंदे-फडणवीस सरकारची बैठक पार पडली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उंचीवरची मर्यादा काढली असल्याचं स्पष्ट केलं आहे. कायदा आणि सुवव्यस्थेचं यामध्ये पालन झालं पाहिजे यासंबधी सूचना दिल्या आहेत. ध्वनीप्रदुषणाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोविडचे सगळे निर्बध काढले आहेत. मंडपच्या संबधीही सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
दहिहंडी आणि सगळे उत्सवात कायद्याचं पालन करण्यास सांगितलं आहे. हायर्कोटाच्या, सुप्रीमकार्टाच्या नियमानुसार दहीहंडी उत्सव करण्यास सांगितलं आहे. खड्डे दुरूस्तीची कामे जलद आणि विसर्जनाघाटाशी लाईटची व्यवस्था करण्यास सांगितली आहे. कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेस सोडणार असल्याचंही शिंदे म्हणाले.
दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त एकूण 214 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहेत.