बहुचर्चित SSC घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (E D) पश्चिम बंगाल मध्ये छापा टाकला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सक्त संचलनालयाकडून प्राप्त माहितीनुसार या धाडीत 20 कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली. या नोटांचे मातीसारखे ढिग करण्यात आले, एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रक्कम आहे.
सक्तवसुली संचलनालयाच्या एका टीमने बंगालच्या बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तपासासाठी शुक्रवारी बंगालच्या दोन मंत्र्यांच्या घरांवर छापे टाकले. पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली. सक्तवसुली संचलनालयाचे तब्बल सात ते आठ अधिकारी या दोघांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी 3 तास तपास करत ही धक्कादायक माहिती समोर आणली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारद्वारे अनुदानित (Granted) आणि विनाअनुदानित (Non-Granted) शाळांमध्ये सी आणि डी समूहाच्या कर्मचाऱ्यांची आणि शिक्षकांची भरती करण्यात आली. या भरतीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. यावेळी पैशांची मोठ्या प्रमाणात अफरातफर आणि देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली.
हा घोटाळा झाला तेव्हा, काबिल चॅटर्जी हे शिक्षण मंत्री होते. आता ते ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये ते उद्योग आणि वाणिज्य मंत्री पदावर आहेत.
दरम्यान, यापूर्वी सीबीआयने (CBI) दोन वेळा त्यांची चौकशी केली होती. आता या प्रकरणाचा सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालय युद्धपातळीवर तपास करत आहे. यात घोटाळ्यात अजून मोठ्या प्रमाणात माहिती समोर येण्याची शक्यता आहे.