Site icon सक्रिय न्यूज

शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे यांचे मार्मिक भाष्य…..!

शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे यांचे मार्मिक भाष्य…..!
मुंबई दि.२४ – सुरुवातीच्या काळात भाजप आणि त्यांचे नेते आणि प्रवक्ते हे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे,असे म्हणत होते. पण नंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले, तेव्हा सर्वांना कळून चुकले की, शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा वरदहस्त आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सरकारच्या पहिल्या आणि विशेष अधिवेशनातील दिर्घवेळ चाललेल्या भाषणात हा गौप्यस्फोट केला होता. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक वक्तव्य केले आहे.
           एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बऱ्याच बाबींवर रोखठोक भाष्य केले. ते म्हणाले की, माझ्याकडे फडणवीस आले तेव्हा मी त्यांना सांगितले, की उगीच आजच्या परिस्थितीचे फुकटचे श्रेय घेऊ नका. जी गोष्ट आज घडली आहे, ती ना तुम्ही घडवली, ना अमित शहांनी घडवली ना भाजपने घडविली, ना अन्य कोणी माणसांनी घडवली. ती फक्त उद्धव ठाकरेंनी घडवली. याचे श्रेय फक्त उद्धव ठाकरेंना द्यावे लागेल, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच बाळासाहेब ठाकरे हयात असते तर आजची परिस्थिती ओढवली नसती. शिवसेना एखादी संस्था किंवा पक्ष नसून एका विचाराने बांधली गेलेली माणसे आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवर ती माणसे चालत होती. बाळासाहेब हयात होते, ते विचार होते, ते गेले आणि विचारसुद्धा गेले, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर आणि त्यांच्या दुर्दशेवर भाष्य केले.
            दरम्यान, संजय राऊत यांची रोखठोक आणि शिवराळ भाषेतील बोलणी यामुळे देखील सुद्धा लोकांना कंटाळा येऊन ते दुरावले. मी शिवसेना सोडली तेव्हाची देखील हीच कारणे होती. शिवसेना सोडून गेलेल्यांची कारणे सुद्धा तीच राहिली आहेत. राज ठाकरे यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली त्यात ते बोलत होते.
शेअर करा
Exit mobile version