बीड दि.२४ – येथे मातंग समाज परिवर्तन परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष शितलकुमार जाधव यांनी दिली आहे
बीड शहरांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिनांक २९ वार शुक्रवार रोजी दिड वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे व कोमल ताई साळुंखे ढोबळे हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यू भारतीय टायगर सेनेचे अध्यक्ष प्रभाकरजी लोंढे उस्मानाबाद हे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बीड शहरातील नगरसेवक भिमराव वाकचौरे, नगरसेवक भैय्या मोरे हे उपस्थित राहणार आहेत. हा सदरील कार्यक्रम मातंग समाजातील तळागाळातील मातंग समाज बांधवांनी एकत्र येऊन करण्याचे योजिले असून समस्त बांधवांना विनंती आहे की मातंग समाजा ला एक वेगळी दिशा देण्यासाठी मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारावर, समाजातील कार्यकर्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच मातंग समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी हा मातंग समाज परिवर्तन परिषद ठेवण्याचे आयोजिले आहे.तसेच रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून मातंग समाजाला एक वेगळी दिशा मिळण्यासाठी मातंग समाजासाठी अहोरात्र झटणारे मातंग समाजाचे नेते रमेश तात्या गालफाडे यांना मातंग समाज परिषदेला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शितल कुमार जाधव यांनी बोलून मातंग समाजातील अडचणी, कार्यकर्त्याचे काही प्रश्न, समाजावरील होत असेल तसेच अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे नवीन धोरण व मंडळाचे बजेट वाढविणे अशा समाजातील अनेक विषयावर या मातंग समाज परिषद परिवर्तन याच्या माध्यमातून समाजाला कुठे ना कुठेतरी वेगळी दिशा देण्याचं काम रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून होणार आहे.
तरी बीड जिल्ह्यातील समस्त मातंग बांधवांनी व महिलांनी या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संपूर्ण मातंग समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.