Site icon सक्रिय न्यूज

राज्यस्तरीय वंजारी समाज भूषण पुरस्कार धनराज गुट्टे यांना जाहीर…..!

राज्यस्तरीय वंजारी समाज भूषण पुरस्कार धनराज गुट्टे यांना जाहीर…..!
अहमदनगर दि.३१ – जय भगवान युवा प्रतिष्ठान दैत्यनांदूर ता पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांच्या कडून दिला जाणारा राज्यस्तरीय वंजारी समाज भूषण पुरस्कार – 2022 लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील येलदरवाडी गावचे सुपुत्र, वंजारी समाजासाठी व समाजातील घटकांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे, समाजाची मुलुख मैदानी तोफ धनराज विक्रम गुट्टे यांना जाहीर झाला आहे.
        श्री. गुट्टे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या सहवासात, तालमीत तयार झालेले समाजाचे धडाडीचे युवक नेतृत्व आहे. ते सध्या भारत सरकारच्या रेल्वे बोर्डाचे सदस्य देखील आहेत, अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असुन संघटनेच्या माध्यमातून देशभरात त्यांनी समाजाचे मोठे संघटन उभे करत असताना दिवसरात्र ते राजकीय व सामाजिक कामानिमित्त प्रवासात असतात. आज पर्यंत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न आंदोलनांच्या माध्यमातून सोडवले
आहेत. ते जेव्हढे शांत, संयमी आहेत तेव्हढेच आक्रमक देखील असतात. त्यांच्या या सर्व कार्याचा विचार करून जय भगवान युवा प्रतिष्ठान यांच्या कडून त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
                      सदरील संस्था दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देत असते .सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल धनराज गुट्टे याना हा पुरस्कार देण्यात आला आहे. राजकारण व प्रशासन यावर त्यांची मजबूत पकड असल्याने त्यांना प्रशासनाचा सखोल अभ्यास देखील आहे. ते उत्कृष्ट संघटक व वक्ते आहेत तसेच ते निर्व्यसनी युवा व्यक्तिमत्व आहेत. लवकरच एका भव्य कार्यक्रमात दैत्यानांदूर ता पाथर्डी येथे समाज प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर, राज्याचे नेते माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंढे साहेब यांच्या शुभ हस्ते या पुरस्कार चे वितरण सोहळा होणार आहे.
          दरम्यान युवक नेते धनराज गुट्टे यांना या अगोदर जानेवारी महिन्यात सातारा येथे देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्याच्या युवा पिढी मध्ये धनराज गुट्टे यांचा राज्यभरात कामाचा कायम झंझावात असतो.
शेअर करा
Exit mobile version