मुख्यमंत्री साहेब बीड जिल्हा पण महाराष्ट्रातच आहे – सुमंत धस
डी डी बनसोडे
केेेज – बीड सोडता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा स्वीकारण्यासाठी कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.बीड जिल्ह्यावर असा अन्याय का?असा सवाल मनसेने विचारला आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षे विविध संकटाचा सामना करत आहे,त्या मध्ये या वर्षी सोयाबीन बियाणे उगवले नाही,वरून कोरोनाचे संकट या सर्व गोष्टी मध्ये जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे.
उद्या पाऊस टिकून राहील का नाही याची खात्री नाही,शेतकऱ्यांनी पेरण्यातर केल्या आहेत उद्या पावसाने खंड दिला किंवा पिकांवर नवीन रोगराई आली तर शेतकरी काय करणार.पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढून ठेवतो जेणे करून काही कारणाने पीक वाया गेले तर त्या बदल्यात विमा कंपनी कडून काही न काही मोबदला मिळतो त्या मधून शेतकऱ्यांचा पेरणी साठी झालेला खर्च शेतकऱ्यांच्या पदरात पडतो.
बीड जिल्हा वगळता महाराष्ट्रातील ईतर सर्व जिल्हा मध्ये विमा कंपन्यांनी विमा भरून घेणे चालू केले आहे.बीड जिल्हा मध्ये एकही विमा कंपनीने विमा स्वीकारन्याची निविदा का टाकली नाही याचे कारण माहिती नाही परंतु सरकाने या मध्ये लक्ष घालून बीड जिल्हा साठी शासकीय विमा कंपनी नियुक्त करून विमा भरून घेण्याची प्रकिया चालु करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय दयावा.
बीड जिल्हासाठी शासकीय विमा कंपनी तात्काळ नियुक्त करावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे ट्विटर च्या माध्यमातून मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी केली आहे.