Site icon सक्रिय न्यूज

केजमध्येही एका अधिकाऱ्याची ईडी चौकशीची मागणी…..!

केजमध्येही एका अधिकाऱ्याची ईडी चौकशीची मागणी…..!
केज दि.5 – येथील विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या अनेक योजना मध्ये गुत्तेदाराशी संगनमत करून  मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केला असल्याने त्यांची व त्यांच्या नातेवाईकाची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी शिवसंग्राम महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा तेजश्री खामकर यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्याकडे केली आहे.
केज येथील विद्युत वितरण कंपनीचे                          उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी संगमताने तालुक्यातील शेतकऱ्यांना डीपीडीसी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या डीपी हि शेतकऱ्याकडून पैसे घेऊन बसवले असल्याने डीपीडीसी योजने अंतर्गत मंजूर झालेले डीपी कोठे बसवले याची हि सखोल चौकशी करावी अशी मागणी हि त्यांनी केली आहे. तसेच विद्युत वितरण कंपनीच्या स्टोअर रूम मधून तालुक्यातील शेतकऱ्यांना फ्युज, केबल आदींसह अन्य साहित्य देणे आवश्यक असताना  ते साहित्य  शेतकऱ्यांना दिले जात  नसल्याने शेतकऱ्यांना ते विकत घ्यावे लागते. त्यामुळे मागील चार वर्षात विद्युत वितरण कंपनीच्या स्टोअर रूमला आलेल्या विद्युत साहित्याचे काय केले ? ते कोणाला वाटप केले? यासह तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी केंद्रसरकारने चालू केलेल्या सौभाग्य योजनेचा लाभ या योजनेतील लाभार्थीना न देता त्यांना या योजने पासून वंचित ठेवण्याचे काम उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी केल्याने याची सखोल चौकशी करावी व त्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या विविध कामात गुत्तेदाराना हाताशी धरून कामे न करताच लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याने त्यांची व त्यांच्या नातेवाईकाची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
                निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत. तर निवेदनावर शिवसंग्राम संघटनेच्या साक्षी हंगे, दीपक कोल्हे, नामदेव गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या स्वाक्षरी आहेत.
शेअर करा
Exit mobile version