Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील दोन गावात तीन ठिकाणी पोलिसांच्या धाडी…..!

केज तालुक्यातील दोन गावात तीन ठिकाणी पोलिसांच्या धाडी…..!
बीड दि.७ – मागच्या कांही महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक पथक प्रमुख एपीआय विलास हजारे यांनी केज तालुक्यात धाडसी कारवाया करत कित्येक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याचप्रमाणे कालही केज तालुक्यात तीन ठिकाणे छापे मारून मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेतले आहेत.
           अधिक माहिती अशी की, दि.६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० ते ८ वाजेच्या दरम्यान माळेवाडी, दैठणा या गावामध्ये तीन ठिकाणी छापे मारून पाच आरोपी विरुद्ध गुन्हे नोंद करून ३७९०५ रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करून तीन वेगवेगळे गुन्हे केज पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेले आहेत.
                  सदरची कारवाई सपोनी विलास हजारे जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड व सोबत पथकातील अंमलदार पोकॉ वनवे, राख,गायकवाड, काकडे, चव्हाण, कडू असे आरसीपीतील पोलीस अमलदार यांनी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून केली आहे.
                      सदरच्या कारवाईमध्ये वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यामध्ये दैठणा या गावातील विजय नरहरी कातमांडे, माळेवाडी गावातील विकास नारायण जाधवर, उमेश नारायण जाधवर, कल्याण गुलाब गिरी, विष्णू मारुती शिंदे अशा पाच आरोपीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील दोन आरोपीना जागीच ताब्यात घेण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version