अंबाजोगाई दि.12 – मेहंदी क्लासला निघालेल्या अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने पळवून नेत तिच्यावर महिनाभर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणास अंबाजोगाई अपर सत्र न्या. डी.डी. खोचे यांनी दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला. बाळासाहेब उर्फ खंडू धनंजय वळसे (रा. वळसे वस्ती, ता. केज) असे त्या तरुणाचे नाव आहे.
अत्याचाराची ही घटना पाच वर्षापुर्वी केज तालुक्यात घडली होती. खंडू वळसे याने मेहंदी क्लासला निघालेल्या अल्पवयीन मुलीस अडवून तिचे तोंड दबून जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये टाकून पळवून नेले. तो तिला पुण्यला घेऊन गेला आणि तिथे तिला तब्बल एक महिना ठेवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी २६ एप्रिल २०१७ रोजी केज पोलीस ठाण्यात खंडू याच्यावर कलम ३६३, ३७६ (i), ३४४, ३४ भा. द. वी सहकलम ३, ४ बा. लैं. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद झाला. तत्कालीन पोलीस निरिक्षक आर. जी. गाडेवाड यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणाची सुनावणी अपर सत्र न्या. डी. डी. खोचे यांच्या न्यायालयासमोर झाली. यावेळी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून अपर सत्र न्या. डी.डी. खोचे यांनी आरोपीला दोषी ठरवले आणि त्यास दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख रूपये दंड ठोठावला.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे रामेश्वर एम. ढेले यांनी काम पहिले. त्यांना वरीष्ठ सरकारी वकील अशोक व्ही कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले तर ऍड. नितीन पुजदेकर यांनी त्यांना मदत केली. पोलीस पैरवी म्हणून पो. हे. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.