पाटोदा – येथून जवळच असलेल्या बामदळवाडी जवळ आयशर टेम्पो आणि कारच्या झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे.
सर्व मयत व्यक्ती केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.आज सकाळी पुणे येथून गावाकडे येत असताना एका टेम्पोने कारला चिरडले आणि यात सहा जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. सध्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.