Site icon सक्रिय न्यूज

केज रोटरी च्या अध्यक्षपदी प्राचार्य डोईफोडे

संधी शोधता आल्या पाहिजेत – हरीश मोटवाणी

केज दि. ४ (वार्ताहर) जगात निसर्ग आणि मानवाने लाखो संधी निर्माण करून ठेवल्या आहेत आपण त्या शोधल्या पाहिजेत. जगाला संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी हे माध्यम समाजाला मोठा आधार आहे.असे मत प्रांतपाल हरीश मोटवाणी यांनी केज रोटरी च्या पदग्रहन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर उपप्रांतपाल संतोष मोहिते, केज क्लब चे अध्यक्ष प्राचार्य लक्ष्मणराव डोईफोडे व सचिव रो धनराज पुरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शारीरिक अंतर व नियमांचे पालन करून करण्यात आले होते.

यावेळी प्रांतपाल हरीश मोटवाणी यांनी केज रोटरी क्लब द्वारा केलेल्या कार्याचा गौरव केला. केज सारख्या ग्रामीण भागात या क्लब च्या आजपर्यंतच्या सर्वच माजी अध्यक्षांनी प्रशंसनीय कार्य केल्याचे म्हटले. चालू वर्षी रोटरी इंटरनॅशनल च्या उद्दीष्टे व अपेक्षित कार्याचीही माहिती दिली. पदग्रहन सोहळ्यात मागील अध्यक्ष रो. अरुण अंजान व सचिव रो. हनुमंत भोसले यांनी आपला पदभार विद्यमान अध्यक्ष रो. प्राचार्य लक्ष्मण डोईफोडे व सचिव रो. धनराज पुरी यांच्याकडे सोपवला. विद्यमान अध्यक्ष प्राचार्य लक्ष्मण डोईफोडे यांनी चालू वर्षात केज क्लब द्वारा विविध समाज उपयोगी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त केला. या कार्यक्रमात  दिनविशेष औचित्य साधून  डॉक्टर्स डे च्या निमित्त कांही डॉक्टर्स, सीए व कृषीदिन म्हणून निवडक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना विरोधात कार्य केलेल्या ११ लोकांना प्रांतपाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपप्रांतपाल संतोष मोहिते, माजी अध्यक्ष अरूण अंजान, सचिव हनुमंत भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रो. सूर्यकांत चवरे व रो. प्रवीण देशपांडे यांनी केले तर आभार रो. धनराज पुरी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो. दादा जमाले, संजय पैठणकर, विकास मिरगणे,  महेश जाजू, सीता बनसोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा
Exit mobile version