Site icon सक्रिय न्यूज

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज बीड जिल्हा दौरा……!

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज बीड जिल्हा दौरा……!
बीड, दि. 18 – मा. राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांचा आज बीड जिल्हा दौरा असून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विविध ठिकाणी ते भेटी देणार आहेत.
       शनिवार, दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.15 वाजता लातूर येथून अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता शासकीय विश्रामगृह, ता. अंबाजोगाई येथे आगमन व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेडक्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीसाठी राखीव. दुपारी 1.30 ते 3.00 पर्यंत भोजनासाठी राखीव. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी मंदिराकडे प्रयाण. दुपारी 3.05 वाजता योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई येथे दर्शनासाठी राखीव. दुपारी 3.15 वाजता शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 4.20 वाजत परळी वैजनाथ मंदिर, परळी येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. दुपारी 4.40 वाजता परळी वैजनाथ मंदिर येथून शासकीय विश्रामगृह परळीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह परळी येथे  आगमन राखीव व मुक्काम.
               शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह परळी जिल्हा बीड येथून लातूरकडे प्रयाण होईल.
शेअर करा
Exit mobile version