केज दि.१९ – अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षकांसह केज ठाण्याच्या पथकाने केज शहरातील एका मटका बुक्कीवर छापा मारला. दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील मंगळवार पेठेतील एका मटका बुक्कीत मटका घेतला जात असल्याच्या गुप्त माहितीवरून अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या आदेशानुसार १८ ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिंदे व केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या पथकातील देवानंद देवकते, शुभम राऊत, बाळासाहेब अहंकारे यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी श्रीराम प्रकाश डबरे व शरद शिवाजी लोंढे हे दोघे मिलन व चेन्नई नाईट नावाचा मटका जुगार खेळवत असताना मिळून आले. त्यांच्याकडून नगदी १ हजार ५५० रूपये, दोन मोबाईल असा १० हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस नाईक देवानंद देवकते यांच्या फिर्यादीवरून श्रीराम डबरे, शरद लोंढे या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.