Site icon सक्रिय न्यूज

दोनशे फूट दरीत कार कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू….!

दोनशे फूट दरीत कार कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू….!
 माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार तब्बल 150 ते 200 फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत तिन्ही प्रवासी वाशिम जिल्ह्यातील आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.                        वाशिम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटन करून परतीच्या वाटेवर असताना माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) कारचा अपघात झाला. 200 फूट खोल दरीत कार कोसळली. यामध्ये गाडीचा चुराडा झाला आहे. ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. यांचा जागीच मृत्यू झाला असून हे सर्वजण वाशिम जिल्ह्यातील आहेत.
ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रोशन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवार 20 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास झाला. वाशिमहून तळ कोकणात असलेल्या देवगड याठिकाणी हे पर्यटक जात होते. यावेळी हा भीषण अपघात झाला. त्यांची कार ताम्हिणी घाटात आली. एक वळणावर ही कार कठड्याला धडकून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली.
           दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील तसेच माणगाव पोलीस पथक तसेच साळुंखे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकादेखील याठिकाणी बोलावण्यात आली. कारमध्ये तिघे मृत झाले होते तर चार तरूण अडकून पडले होते. त्यांना पोलीस तसेच साळुंखे रेस्क्यू टीमने बाहेर काढले. मृत आणि जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंबंधी घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version