Site icon सक्रिय न्यूज

”त्या” अपात्र शिक्षकांची पगार रोखली….!

”त्या” अपात्र शिक्षकांची पगार रोखली….!
टीईटी गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा 2019 मध्ये 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने या उमेदवारांना अपात्र ठरवले गेले आहे. या गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या प्राथमिक शाळेच्या 576 आणि माध्यमिक शाळेच्या 447 शिक्षकांचा समावेश आहे.  या अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे.
                         वेतन बंद करण्याचा निर्णयाबरोबरच या शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवण्याच्या सूचना संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अपात्र यादीतील शिक्षक हे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे.
                दरम्यान, हे शिक्षक अपात्र ठरल्यानंतर सुद्धा शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत होते. त्यामुळे या अपात्र शिक्षकांना ऑगस्टपासून वेतनापासून वगळण्यात यावे अशा सूचना शिक्षण संचालकांकडे देण्यात आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version