Site icon सक्रिय न्यूज

दहा लाखाची मागणी करीत विवाहितेचा छळ……! 

दहा लाखाची मागणी करीत विवाहितेचा छळ……! 
 केज दि.२५ – गाडी घेण्यासाठी व मुलींच्या शिक्षणासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना खामगाव ( ता. जि. उस्मानाबाद ) येथे घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
       केज तालुक्यातील लाखा हे गाव माहेर असलेल्या रूबीना सिकंदर शेख ( वय ३५ ) या महिलेस तिचा पती सिकंदर मजनु शेख ( रा. खामगाव ता. जि. उस्मानाबाद ) याने तुझे आईवडीलांनी लग्नात चांगले कपडे घेतले नाहीत, मानपान चांगला दिला नाही असे म्हणुन शिवीगाळ करीत मारहाण करत होता. त्यानंतर गाडी घेण्यासाठी व मुलींच्या शिक्षणासाठी तुझ्या आईवडीलांकडुन १० लाख रूपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला. मात्र तेवढी रक्कम आणण्यास नकार दिल्याने तिचा शारिरिक व मानसिक करीत लाथाबुक्याने मारहाण केली. तु पैसे आणले नाहीस तर जिवे मारून टाकीन अशी दिली. अशी फिर्याद रूबीना शेख यांनी दिल्यावरून तिचा पती सिकंदर शेख याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निर्मला गंभीरे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version