Site icon सक्रिय न्यूज

”या” तारखेपासून पावसाची शक्यता…..!

”या” तारखेपासून पावसाची शक्यता…..!
 राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे.
             दरम्यान, येत्या  चार ते पाच  दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या काही दिवस राज्यात पावसाची विश्रांती असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर दुसरीकडं आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
                दरम्यान, 1 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्यानं शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
शेअर करा
Exit mobile version