केज दि.३१ – मागच्या अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने तालुक्यात विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. मात्र यामध्ये वीज कोसळून एक महिला ठार झाली असून तिघे जखमी आहेत.
तालुक्यातील काळेगाव घाट येथील आत्माराम माणिक आगे, अन्नपूर्णा आत्माराम आगे, रामरतन चंद्रकांत आगे आणि शीला रामरतन आगे हे शेतकरी कुटुंब सायंकाळच्या सुमारास काळेगाव शिवारात असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. यामध्ये शीला आगे यांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत.