Site icon सक्रिय न्यूज

घरफोडी करून  ७१ हजाराचा ऐवज लांबविला…..! 

घरफोडी करून  ७१ हजाराचा ऐवज लांबविला…..! 
केज दि.४ – अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाट तोडून कपाटात ठेवलेले नगदी २ हजार रुपये आणि ६९ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शिंदी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
     शिंदी येथील शेतकरी अरुण अनुरथ जाधव हे पत्नीसह गावी राहत असून त्यांचा मुलगा सुशील जाधव हा पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करतो. अरुण जाधव यांचा पाय दुखू लागल्याने उपचारासाठी ३० ऑगस्ट रोजी मुलाकडे पुण्याला गेले. घरी त्यांच्या पत्नी एकट्या होत्या. १ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या त्यांच्या पत्नी गावात कापण्यासाठी शेतात गेल्या असता घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरटे हे घराच्या पाठीमागील गेटमधून घरात शिरले. त्यांनी घरात प्रवेश करीत कपाट तोडून कपाटात ठेवलेले ६ ग्रॅमचे सोन्याचे मनीमंगळसुत्र गंठन, ५ ग्रॅमची सोन्याची बोरमाळ, ४ ग्रॅमचे कानातील झुमके फुले, अर्धा ग्रॅमची नथ, २ ग्रॅमची अंगठी, अडीच ग्रॅमचा गळ्यातील सोन्याचा पत्ता, अर्धा ग्रॅमच्या कानातील सोन्याचा काड्या, अर्धा ग्रॅमची अंगठी, अर्धा ग्रॅम सोन्याची सुई, दोन चांदीचे चैनाचे जोड, लहान मुलाचे हातातील बिंदली एक जोड हे दागिने असा ७१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. अरुण जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार उमेश आघाव हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version