केज दि.५ – एका शेतकरी कुटुंबातील ३० वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सातेफळ (ता.केज) येथे उघड झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सातेफळ येथील दत्तात्रय बालासाहेब बोबडे वय ३० वर्ष या शेतकरी कुटुंबातील तरुणाने रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास घरातील पत्र्याच्या लाकडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे. युसुफवडगाव पोलीस सदरील आत्महत्ये संदर्भात पुढील माहिती घेत आहेत.