राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान ६ सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा चंद्रपूर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया तर ७ सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड.तसेच 8 सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली तर ९ सप्टेंबर रोजी सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, नगर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया इत्यादी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे.