संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. भारतात आतापर्यंत 7 लाख लोकांना या साथीच्या आजाराने ग्रासले आहे, परंतु भारतात असेही एक राज्य आहे जिथे आजपर्यंत एकाही व्यक्तीला या प्राणघातक विषाणूची लागण झालेली नाही. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचा एकही संसर्गग्रस्त रुग्ण आढळलेला नाही.
दरम्यान, कोरोना विषाणू जगभर पसरलेला असताना लक्षद्वीप यापासून कसा बचावला याबाबत उत्तर देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वप्रथम आम्ही येथे पर्यटकांच्या येण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर तेथील कायमस्वरुपी नागरिकांना येथे परत येण्याची परवानगी देण्यात आली.