शेतात दुपारच्या सुमारास वीज कोसळली. यात चरत असलेला एक बैल मृत्युमुखी पडला. तर शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना दि.१२ रोजी दुपारी परळी तालुक्यातील लेंडेवाडी येथे घडली.
लेंडेवाडी येथे शेतकरी उत्तमराव पवार हे आपल्या शेतात बैलाला चरण्यासाठी घेऊन गेले होते. सकाळपासूनच ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाट होत होता. बैल चारत असताना छत्री घेऊन ते सोबत थांबले असताना अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. यामध्ये चरत असलेला बैल मृत्युमुखी पडला. तर उत्तमराव पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.