नेकनूर दि.१२ – येथील ज्ञानदीप कोचिंग क्लासेस सांस्कृतिक व सामजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर दोन वर्षांनी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक तुळजीराम शिंदे यांच्याकडून गणपती बाप्पा च्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले.
बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक लहझिम पथक, टिपरी पथक, मराठमोळे फेटे आकर्षक दिसत होते गाण्यां वरती डान्स बसवून लहान लहान मुलांनी आपल्या नृत्याने लक्ष वेधले होते. ज्ञानदीप च्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक व विसरत चाललेल्या खेळांचे महत्वाचे आकर्षण असते त्यामुळे ज्ञानदीप गणेश मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन म्हटले की गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोदवतात.
विसर्जन मिरवणुकी नंतर दरवर्षी ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यामधे शेकडो विद्यार्थी त्यांचे पालक व गावातील मंडळी गणेशभक्त आवडीने आस्वाद घेतात यामध्ये शिरा भात कडी हे पारंपरिक पक्वान्न बनवले जातात.
गणेश विसर्जन जसे जवळ येते तसे सर्वच भावूक होऊन आपल्या गणरायाला या वर्षीच्या उत्सवातील शेवटची आरती म्हणून जड मनाने निरोप देतात.विसर्जनाच्या वेळी बाप्पाची आरती करताना ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक तुळजीराम शिंदे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बप्पा शिंदे, माजी पंचायत समिती सभापती कोकाटे सर, नेकनूर पोलीस स्टेशन चे API शेख मुस्तफा, PSI विलास जाधव, माजी ग्रा.स. शिवाजी शिंदे, करांडे सर,वाणी सर,पत्रकार सुरेश रोकडे,पत्रकार अशोक शिंदे,पत्रकार संभाजी भोसले,सखाराम शिंदे,राजू शिंदे, प्रभू दादा भोसले, रमेश रोकडे, क्लासेस चे मुळे सर , कानडे सर, काजळे सर, रंजीत मुळे,रोकडे मॅडम, हावळे मॅडम तसेच विद्यार्थी,पालक व परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.