Site icon सक्रिय न्यूज

महासभा समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध – नंदकुमार गादेवार….!

महासभा समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध – नंदकुमार गादेवार….!
 धारूर दि.१३ – महासभेचा मूळ उद्देशच समाजाला संघटित करणे व समाजातील प्रत्येक घटकाला एक उंची गाठून देणे आहे त्यासाठी आम्ही सगळे सदैव प्रयत्नशील आहोत आज स्वयंरोजगारासाठी मदतीचा हात या माध्यमातून आपण 15 कुटुंबाना त्यांचे जीवनमान उंचावता यावे त्यांना आपला उदरनिर्वाह करता येणे सोपे व्हावे यासाठी पिठाची गिरणी व शेवई मशीन देत असल्याचे सांगत महासभा आता सर्वच आघाड्यांवर गतिशील राहणार असल्याचे सूतोवाच महासभेचे राज्याध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी केले
         धारूर येथे महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा , आर्यवैश्य महासभा बीड जिल्हा  यांच्या संयुक्त विद्यमाने कै गजानन डुबे यांच्या स्मृतीप्रीत्यार्थ आर्यवैश्य समाजातील गरजवंतांना मदतीचा हात व दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरेश्वर देवालय पुणेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोले हे होते तर महासचिव गोविंद बिडवई , कोषाध्यक्ष अनिल मनाटकर , संघटनप्रमुख प्रदीप कोकडवार , नरेंद्रजी येरावार , राज्यसाहसचिव अभय कोकड     राज्यकार्यकारिणी सदस्य अनिल चिद्रवार , अजित भावठणकर ,  जिल्हाध्यक्ष सुमित रुद्रवार , जिल्हासचिव वैभव झरकर , कार्याध्यक्ष सूर्यकांत महाजन , कोषाध्यक्ष अभय भावठणकर , धारुरचे अध्यक्ष बालाजी पिलाजी , महिला अध्यक्षा प्राजक्ता गुंडेवार , सचिव सुप्रिया चिद्रवार , कार्याध्यक्ष मनीषा झरकर , कोषाध्यक्ष सोनाली रुद्रवार ,  यांची प्रमुख उपस्थिती होती
             पुढे बोलताना गादेवार म्हणाले कि या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकासाठी काम करण्याची महासभेची प्रतिबद्धता समाजातील सर्वांनाच लक्षात येईल यावर आणखीन मोठ्याप्रमाणात कार्यकरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आता संघटनेची बांधणी तालुकास्तरावर देखील होणे गरजेचे असल्याची अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली  पालकांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे हेच शिक्षण मुलांचे व पालकांचे भविष्य घडवणारे आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या परंतु शिक्षणात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांनी पैशांची चिंता करू नये महासभेच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी सहकार्य व मदत देण्याची ग्वाहीदेखील त्यांनी देत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले  यावेळी लक्ष्मीकांत कोले , गोविंद बिडवई , प्रदीप कोकडवार , अभय कोकड , आदींचीही समयोचित भाषणे झाली
तसेच बीड जिल्ह्याची कार्यकारिणी महासभेच्या सूचनांचे पालन करण्याबरोबरच वंचित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी सतत क्रियाशील असल्याने त्यांचा अभिमान वाटतो असे गौरवोदगार गादेवार यांनी काढत कौतुक केले. यावेळी समाजाचे जेष्ठ व्यक्तिमत्व तथा मार्गदर्शक विकास डुबे यांचे अमृतमहोत्सवी वर्षे असल्याने त्यांचा सन्मानपत्र , स्मृतिचिन्ह देऊन सहकुटुंब विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या सचिवपदी शशिकिरण गडम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष सुमित रुद्रवार यांनी यावेळी संघटनेच्या मागील कार्याचा आढावा सादर करत आगामी कार्याची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली व यापुढे दरवर्षी महासभेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली  तसेच महिला अध्यक्षा प्राजक्ता गुंडेवार यांनी देखील आपल्या भाषणातून महिला महासभेच्या कार्याचा लेखाजोखा मांडत आगामी कार्यक्रमांची रूपरेषा देखील सांगितली
        यावेळी मान्यवरांच्या हस्ते बीड ,  माजलगाव , परळी , अंबाजोगाई , धारूर व केज येथील 15 गरजवंत महिलांना  पिठाची गिरणी व शेवई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा महासभा व  कै गजानन डुबे व कै वंदना पारसेवार , कै अनिता अच्युत रुद्रवार  यांच्या समृतिप्रीत्यार्थ रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच अमेरिकेत नुकतेच पायलट प्रशिक्षण पुर्ण केलेल्या शंतनु भावठणकर याचे वडील धनंजय भावठणकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला
       कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महिला महासभा जिल्हाप्रसिद्धीप्रमुख सौ अपर्णा शेटे , प्रमोद बिडवई व अजय डुबे यांनी संयुक्तरित्या केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासभेच्या धारूर शाखेने विशेष परिश्रम घेतले.
शेअर करा
Exit mobile version