केज दि.१३ – मोबाईल वरून जीवे मारण्याची धमकी देऊन गावात गेल्या नंतर मोटार सायकल अंगावर घालून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दि. १० सप्टेंबर रोजी सर्जेराव विनायक वनवे वय १९ वर्षे रा. शिरपुरा ता. केज याला दुपारी ४:०० वा. च्या सुमारास तो केज येथील सुहाना हॉटेल समोर उभा असताना त्याच्या गावातील योगेश बाबुराव हंगे याने त्याचे मोबाईल वरून फोन करून विचारले की तु कुठे आहेस? तेव्हा सर्जेराव वनवे त्याला म्हणाला की, मी केजमध्ये आहे. तेव्हा योगेश हा सर्जेराव हंगे याला म्हणाला की तु गावाकडे ये. तुला जीवच मारायचे आहे. अशी धमकी दिली व फोन बंद केला. त्या नंतर ४:३० वा. सर्जेराव शिरपुरा येथे गेला. त्या वेळी त्याचा भाऊ हनुमान वणवे हा गावातील खमर भाईच्या दुकाना समोर उभा होता. तेव्हा योगेश हंगे याने त्याची मोटार सायकल हनुमान वनवे याच्या अंगावर घेवुन गेला आणि त्याला म्हणाला की, तु माझ्या गाडीला धक्का का लावलास ? असे म्हणून त्याने सर्जेराव वनवे व हनुमान वनवे या दोघा भावांना शिवीगाळ करून लाथा-बुक्याने व चापटाने मारहाण केली. तसेच घरातील लोकांना कुऱ्हाडीने जीवे मारून टाकतो. असी धमकी दिली.
सर्जेराव वनवे यांच्या तक्रारी वरून योगेश हंगे रा. शिरपुरा यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस नाईक त्रिंबक सोपने हे पुढील तपास करीत आहेत.