Site icon सक्रिय न्यूज

३४ वर्षीय महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा……! 

३४ वर्षीय महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा……! 
केज दि.१३ – एका ३४ वर्षीय महिलेस हाताला धरून तू खूप आवडतेस असे म्हणत विनयभंग करीत पीडितेच्या आईस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी एक जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
     केज तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय महिलेच्या हाताला धरून सखाराम तुकाराम सारुक ( रा. जोला ता. केज ) याने तू खूप आवडतेस असे म्हणत सखाराम तुकाराम सारुक ( रा. जोला ता. केज ) लज्जास्पद कृत्य करीत विनयभंग केला. तसेच तुझ्या घरासमोरुन किती चकरा मारतो, तु माझ्याकडे का बघत नाहीस असे तो म्हणत  असताना फिर्यादीच्या आईने ते ऐकून तु काय म्हणतोस असे विचारले. त्यावेळी सखाराम सारुक याने पीडितेच्या आईस जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून सखाराम सारुक याच्याविरुद्ध केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक मेसे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version